मुख्यमंत्री शिंदेंच्या घोषणेनंतर राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! आजचा नेमका दर काय?
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंधनावरील अबकारी करात (VAT) कपात करण्याची घोषणा सोमवारी केली. कॅबिनेटच्या बैठकीनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्रातील इंधन दर कमी होऊन सर्वसामान्यांच्या खिशावरील भार कमी होईल अशी अपेक्षा आहे.दरम्यान, आज मंगळवारी तेल कंपन्यांकडून इंधन दर जाहीर झाले आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या भावात (Petrol-Diesel Price) कोणताही बदल झाला नाही.
गेल्या सव्वा महिन्यापासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. आज जाहीर झालेल्या नवीन दरानुसार जळगावात पेट्रोल ११२. १९ रु. प्रति लिटर तर डिझेल ९७.३४ रु.प्रति लिटर पर्यंत विकले जात आहे.दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. पेट्रोलवर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये अबकारी कर कमी करून सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले.
महसूल नुकसानीची होणार भरपाई
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे महसूलात जी घट होत होती, त्याच्या 85 टक्के रक्कम यातून वसूल करण्यात येईल. 21 मे रोजी सरकारने पेट्रोल (Excise duty cut on Petrol)आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटर कपात केली होती. या कपातीमुळे सरकारला वर्षभरात एक लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे तेव्हा सांगण्यात आले होते.
चालू आर्थिक वर्षात मिळणार 52 हजार कोटी
सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी आणि ऑइल इंडिया लिमिटेड तसेच खासगी क्षेत्रातील वेदांत लिमिटेडच्या केअर्न ऑईल आणि गॅसच्या कच्च्या तेलाच्या उत्पन्नावरील करामुळे आणि 2.9 कोटी कच्च्या तेलाच्या उत्पादनामुळे सरकारला दरवर्षी 67,425 कोटी रुपये मिळतील. रिपोर्टनुसार, सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील उर्वरित ९ महिन्यांत सरकारला सुमारे 52 हजार कोटी रुपये मिळतील.