⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

सोन्याचा भाव पुन्हा रेकॉर्ड तोडणार, चांदी 70 हजारांच्या पुढे, आज झाली मोठी वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२३ । भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी आली आहे. आज वायदे बाजारात चांदीचा भाव ७० हजार रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. तर दुसरीकडे सोन्याचा दर देखील विक्रमीकडे वाटचाल करत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज सकाळी १०.३० पर्यंत सोन्याच्या दरात ४२५ रुपयाची वाढ झालेली आहे. तर चांदी तब्बल ११२९ रुपयांनी महागली आहे. Gold Silver Rate Today

या दरवाढीनंतर २४ कॅरेट सोन्याचा दर ५५,६१६ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर ७०, ७१७ रुपयावर पोहोचले आहे. २०२२ मधील सोने-चांदीच्या दराचा विचार केल्यास जानेवारी २०२२ मध्ये सोन्याचे दर ४८ हजार ५०० (प्रतितोळा, जीएसटीविना) होते. डिसेंबरअखेर सोने ५५ हजार ३०० वर पोचले, तर चांदीचे दर ६३ हजार (प्रतिकिलो) होते. ते आता ६९ हजारांवर पोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीत वाढ झाली आहे
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीत तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याची स्पॉट किंमत आज 0.97 टक्क्यांनी वाढून 1,841.39 डॉलर प्रति औंस झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही आज चांदीचा दर तेजीत आहे. चांदीचा दर आज 1.68 टक्क्यांनी वाढून 24.37 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

दिवाळीपासून वाढ सुरू
ऑक्टोबरमध्ये सोने ५१ हजार ८००, तर चांदी ६२ हजारांवर पोचली होती. दिवाळीत ५२ हजार चांदी होती. चांदीचे दर घसरून ते ५९ हजारांवर आले होते. दर स्थिर होते. नंतर मात्र दरात वाढ सुरू झाली. नोव्हेंबरमध्ये सोन्याचे दर ५१, तर ५३ हजारांच्या दरम्यान राहिले. तर चांदी ६१ हजारांवरून वाढत जाऊन ६६ हजार ८०० पर्यंत आली. डिसेंबरमध्ये सोने ५४ हजारांपासून वाढत सध्या ५५ हजार ३०० वर पोचले आहे. तर चांदी ६८ हजारांवरून ६९ हजारांवर आली आहे. सोने-चांदीच्या या दरवाढीला लग्नसराई, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या दरात आलेली तेजी कारणीभूत ठरली.

सोन्याचे वर्षभरातील महिनाअखेरचे दर असे

तारीख – सोने (प्रतितोळे) — चांदी (प्रतिकिलो)
जानेवारी २०२२ — ४८ हजार ५०० — ६३ हजार
फेब्रुवारी– ५१ हजार २००– ६७ हजार
मार्च– ५१ हजार ८०० — ७० हजार
एप्रिल- ५२ हजार -६७ हजार
मे- ५१ हजार ७०० — ६३ हजार
जून–५१ हजार २०० — ६२ हजार ५००
जुलै– ५१ हजार ९०० — ६० हजार
आगस्ट– ५१ हजार ५०० — ५६ हजार
सप्टेंबर—- ५० हजार ४००– ५४ हजार
ऑक्टोबर– ५० हजार ६०० — ५९ हजार
नोव्हेंबर–५२ हजार ८००–६३ हजार
डिसेंबर–५५ हजार ३००–६९ हजार