⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

Gold Silver Rate : सोन्यासह चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ, नवीन 10 ग्रॅमचा दर पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२३ । आजकाल सोने आणि चांदीचा (Gold Silver Rate) संमिश्र व्यापार दिसून येत असून सराफा बाजार तज्ञांना या दोन मौल्यवान धातूंची हालचाल समजू शकलेली नाही. एका दिवशी सोन्याचा भाव वाढतो आणि दुसऱ्या दिवशी तो घसरतो. त्याच वेळी, चांदी देखील आपली चमक पसरवत आहे, परंतु त्याची औद्योगिक मागणी सतत कमी होत आहे. दरम्यान, कालच्या घसरणीनंतर सोन्यासह चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झालेली दिसून येत आहे.मात्र गेल्या दोन महिन्यापासून दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आला नाहीय.

जळगाव सुवर्ण नगरीतील भाव?

जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी 53,860 रुपयांवर आहे. यापूर्वी22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 53,680 रुपये इतका होता. म्हणजेच त्यात 200 रुपयाची वाढ झाली. तर सध्या 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव विनाजीएसटी 58,750 रुपये आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव विनाजीएसटी 58600 रुपयावर होता. त्यात 150 रुपयाची वाढ झालेली दिसून येत आहे. दुसरीकडे सध्या चांदीचा दर विनाजीएसटी 70,600 रुपयावर आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात चांदी 70200 रुपयावर होती. त्यात 400 रुपयाची वाढ झालेली दिसून येत आहे.

दरम्यान, चार महिण्यापुर्वी सोन्याचा दर 58 हजाराच्या घरात होता. एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतीने विनाजीएसटी 62000 हजार रुपयाचा टप्पा ओलांडला होता. तर चांदीच्या किमतीने 77000 हजार रुपयाचा टप्पा ओलांडला होता. जागतिक मंदीची स्थिती भारतीय सराफ बाजारात आगामी लग्नसराईमुळे मागणी वाढण्याच्या अंदाजामुळे सोन्याचे आंतरराष्ट्रीय बाजरात दर वाढून त्याचा परिणाम भारतीय बाजार पेठेत झाला होता. मात्र आता हे चित्र बदलले असून सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील आजचा दर?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, आज बुधवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने 87 रुपयांनी किंचित वाढले आहे आणि 58,496 रुपये प्रति 10 ग्रॅम दरावर व्यवहार करत आहे. सोबतच चांदीचा दर किंचित 10 रुपयांनी घसरला असून 70,490 प्रति किलोवर व्यवहार करत आहे.