जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे देशात पेट्रोल (Petrol Rate) आणि डिझेल (Diesel Rate) स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन महिन्यांहून अधिक काळ राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज (शनिवार), २३ जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज जाहीर झालेल्या दरानुसार जळगावमध्ये आज पेट्रोलची किंमत १०७. ६० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९४.०३ प्रति लिटर इतकी आहे. Petrol Diesel Rate Today

पेट्रोल, डिझेलचे दर 22 मे पासून स्थिर आहेत. केंद्र सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील पेट्रोलच्या दरात ५ रुपयाची तर डिझेल दरात ३ रुपयाची कपात करण्यात आली होती. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे.












