⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

पेट्रोलचे दर १०८ रुग्णवाहिकेच्याही पुढे, जाणून घ्या जळगावातील आजचे नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । मागील गेल्या काही दिवसात पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात प्रचंढ वाढ केली. त्यामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर असल्याचे दिसून येत आहे. आज गुरुवारी पेट्रोल आणि डीझेल दर जैसे थे आहे. 

इंधन दरवाढीने मागील दोन महिन्यात देशात महागाईचा भडका उडाला आहे. सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही विक्रमी पातळीवर आहेत. पेट्रोल झपाट्याने ११० रुपयांच्या दिशेने तर डिझेल शंभरीच्या दिशेने कूच करत आहे. 

आज गुरुवारी जळगावमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपयांवर गेले आहे. तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे. गेल्या वीस दिवसात शहरात पाच वेळा ३४ पैशांनी तर दोन वेळा ३३ पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या २० दिवसात शहरात पेट्रोल दर २.२७ पैसे तर डिझेल ७२ पैशांनी महागले आहे. याच पध्दतीने दरात किरकोळ वाढ होत गेली तर पुढील काही दिवसात पेट्रोल ११० रूपये प्रति लिटर मिळेल यात शंका नाही. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे आधीच सर्वसामान्यांची परिस्थिती नाजूक असताना इंधन दरवाढ सुरूच आहे.

जळगाव शहरात गेल्या वर्षी १४ जून २०२० रोजी पेट्रोलचे दर ८३.७१ रूपये तर डिझेल ७२.५४  प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून तेरा महिन्यात पेट्रोलचे दर २५ रूपये २७ पैशांनी तर डिझेलचे २४ रूपये ५४ पैसे प्रति लिटर वाढले आहेत. जुलै २०२१ या महिन्यात  दरात तब्बल ९ वेळा वाढ करत कंपन्यांनी वाहनधारकांना मोठा झटका दिला. त्यामुळे जनतेत रोष आहे.