⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

सर्वसामान्यांना दिलासा ! जाणून घ्या आजचे पेट्रोल -डिझेलचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । आज देखील इंधनाच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्वच गोष्टी महाग होत असताना गेल्या चौदा दिवसांपासून पेट्रोल (petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर 121.69 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर 104.34 रुपये इतका आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.30 रुपये असून, डिझेल 104. 30 रुपयांवर पोहोचले आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.

गेल्या महिन्यात जळगावमध्ये पेट्रोलचा दर 111.29 रुपये प्रति लिटर इतका होता, त्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल दर सलग वाढत गेले. 1 एप्रिलला पेट्रोल 117.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले होते. तर 6 एप्रिलपर्यंत वाढत ते 121.69 पोहोचले. तेव्हापासून पेट्रोल दर स्थिर आहे. एका महिन्यात पेट्रोल जवळपास 10 रुपयाने महागले आहे.