आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या नवीन दर
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांकडून एक दिवस आड इंधन दरवाढ केली जात आहे. रविवारी कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती जैसे थे ठेवल्या होत्या तर आज सोमवारी त्यांनी दोन्ही इंधन दरात वाढ केली आहे. आज (सोमवार, 31 मे 2021) पेट्रोल दरात प्रतिलीटर 25 ते 31 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दरही 25-29 पैशांनी वाढला आहे.
सततच्या वाढीने जळगावातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. तर डीझेलच्या दराने नव्वदी पार केली आहे. यामुळे आधीच लॉकडाऊनचा फटका बसलेल्या सर्वसामान्यांना आता इंधन दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. जळगावात आज सोमवारी पेट्रोल प्रति लिटर १००.८३ रुपये आहे. तर डीझेल ९१.३७ रुपये आहे.
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १००.४७ रुपये झाला आहे. आज दिल्लीत पेट्रोल ९४.२३ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.७६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९४.२५ रुपये झाला आहे. मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव ९२.४५ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८५.१५ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८९.९० रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८८ रुपये प्रती लीटर झाले आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १०२.३४ रुपये असून डिझेल ९३.६५ रुपये झाले आहे.
पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी
दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.