---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

घरफोडीनंतर 1 किलो चांदी फेकणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२४ । घरफोडी करण्याच्या आधी रेकी न करता घटनास्थळापासून १०० किलोमीटरच्या आत मोबाइल फोन वापरायचा नाही. केवळ १५ मिनिटांत एकट्याने घरफोडी करणाऱ्या करवीर (कोल्हापूर) येथील ३८ वर्षीय सराईत गुन्हेगाराला भडगाव पोलिसांनी वर्धा येथून पकडले, केवळ सोने व रोख रकमेवर डल्ला मारणाऱ्या या गुन्हेगाराने घरफोडीनंतर एक किलो चांदी बसमधून फेकून दिली होती. त्याच्याकडून भडगाव येथे सात महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीतील १२० ग्रॅम सोने हस्तगत केले. त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ५४ गुन्हे दाखल आहेत.

crime 2 jpg webp webp

भडगाव येथील विद्यानगरात राहणारे प्रकाश दत्तात्रय भोसले यांच्या घरी १२ डिसेंबर २०२३ रोजी घरफोडी झाली होती. त्यात सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १० लाख ८६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील इस्युली येथील प्रशांत काशिनाथ कुरेशी (क्य ३८) याचे नाव समोर आले. तो वर्धा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

---Advertisement---

चाळीसगावच्या अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भडगावचे निरीक्षक पांडुरंग पवार व टीमने वर्धा येथे जाऊन त्याला २५ जून रोजी ताब्यात घेतले. त्याने सोने छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे सराफाला दिल्याचे सांगितले. त्याला सोबत नेऊन पोलिसांनी ८,६४,००० रुपयांचे १२० ग्रॅम सोने हस्तगत केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रशांत कुरेशी याच्यावर ५४ गुन्हे महाराष्ट्र, कर्नाटकात दाखल आहेत.

बसमधून फेकली होती चांदी कोणत्याही ठिकाणाची रेकी करायची
नाही, घरफोडी करण्याचा निर्णय घेतलेल्या ठिकाणाच्या १०० किलोमीटर अंतरात मोबाइलचा वापर करायचा नाही. अवघ्या १५ मिनिटात बंद घर फोडून मुद्देमालासह गायब व्हायचे असे त्याचे तंत्र असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. कुरेशी याने भोसले यांच्याकडे घरफोडी केल्यानंतर बसने पसार होत असताना त्याने चोरी केलेल्या एक किलो चांदीच्या वस्तू ओझे नको म्हणून बसमधून फेकून दिल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---