आजचा पेट्रोल-डीझेलचा दर ; जाणून घ्या आजचे जळगावातील नवे दर

जुलै 17, 2021 11:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांकडून सातत्याने पेट्रोल आणि डीझेल दरात वाढ होत आहे. या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. मागील दोन महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढीचा भडका उडाला आहे.

petrol diesel

जळगावमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.६९ रुपयांवर गेले आहे. तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे. दरम्यान, जळगावमध्ये जुलै २०२१ च्या सुरवातीला पेट्रोलचा दर १०६.०७ रुपये प्रति लिटर होता. तो आज १०८.६९ रुपये पर्यंत आहे. जळगावात एका महिन्यात पेट्रोल दरात तब्बल ४ रुपयाहून अधिकने दर वाढले आहे. तर डीझेल दरात ३ रुपयाहून अधिकने वाढले आहे. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल १६ वेळा दरवाढ झाली होती. मे महिन्यातही इंधनाच्या दरात १६ वेळा उसळी पाहायाला मिळाली होती. 

दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव ७१.९३ डॉलर प्रती बॅरल झाला. त्यात ०.३९ टक्के वाढ झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ७३.६९ डॉलर प्रती बॅरल झाला.

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now