⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव जिल्ह्यावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी बूथ रचनेवर लक्ष द्या !

जळगाव लाईव्ह न्यूज | ३१ मे २०२३ | जळगाव जिल्ह्यावर समजा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा असेल तर बूथरचनेवर लक्ष दिले गेलेच पाहिजे असे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा पातळीवरच्या नेत्यांना मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये दिले.

जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक मुंबई येथे आज झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खा. प्रफुल पटेल उपस्थित होते. तर जळगाव जिल्ह्यातूल जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, अरुण भाई गुजराथी, एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर असे मान्यवर उपस्थित होते.

बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ व सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. येत्या काळात जर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी मय करायचा असेल तर बूथरचनांवर लक्ष देणे अतिशय गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याचबरोबर संघटनेची बांधणी करून लवकरात लवकर नियुत्या कराव्यात असेही यावेळी सांगण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील कित्येक नियुकत्या अजूनही झालेल्या नाहीत. अशावेळी तालुक्यानिहाय्यक नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात असेही यावेळी सांगण्यात आले.