प्रवाशी रिक्षा-दुचाकीची धडक, दोन्ही वाहनांचे नुकसान

सप्टेंबर 22, 2021 5:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । एका प्रवाशी रिक्षाला समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना जळगाव ममुराबादरोडवर घडली. या अपघातात रिक्षातील प्रवासी जखमी झाले असून यात दोघी वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी दुचाकीचालक विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident

याबाबत असे की, गोकुळ हनुमंत पाटील (वय-३२) रा. वडगाव बुद्रुक ता. चोपडा हे रिक्षा चालक आहे. १९ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता ते प्रवासी भास्कर लिलाधर साबळे (वय-४०) यांना (एमएच १९ ई ८७८०) ने जळगाव ते ममुराबाद रोडवरून जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकल (एमएच १९, ६२५२) याने भरधाव वेगात येऊन रिक्षाला जोरदार धडक दिली.

यात रिक्षामधील प्रवासी भास्कर साबळे हे जखमी झाले आहे. याप्रकरणी रिक्षाचालक गोकुळ पाटील यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दुचाकीधारक प्रमोद गोपाळ सरदार रा.गोरगावले ता.चोपडा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक बापू कोळी करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now