---Advertisement---
पारोळा

पारोळ्याच्या अभिजीत बागडचे दैदीप्यमान यश!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । पारोळा येथील अभिजीत नंदकिशोर बागड, यांनी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रीकल शाखेच्या तृतीय वर्षी 90% मिळवुन घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच अभिजीत यांची मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे घेण्यात आलेल्या Campus Interview द्वारे Qualitykisok Technologies कंपनीत अभियंता म्हणून देखील निवड करण्यात आली आहे.

jalgoan 3 jpg webp

अभिजीत यांनी एक्स्ट्रा हाय वोल्टेज स्वीचयार्ड प्रकल्पात भाग घेऊन ईव्हीएच स्वीचयार्डमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध उपकरणे आणि वैशिष्ट्यांसह डिझाइन, कॅल्क्युलेशन आणि मांडणी जाणून घेऊन स्वीचयार्ड चा लेआऊट तयार केला असुन त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे. ते पारोळा येथील व्यावसायिक श्री.नंदकिशोर विठ्ठल वाणी यांचे चिरंजीव असुन मा.जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक श्री.स्वप्निल येवले यांचे भाचे आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---