⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

वीज कोसळून दोन जनावऱ्यांचा मृत्यू ; शेतकऱ्याचे मोठं नुकसान…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उन्हाच्या उकाळ्यापासून वाचण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट सगळेच बघत होते. आणि आता महाराष्ट्रात देखील पावसाचे आगमन झाले आहे. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परंतु या पावसामुळे होणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका देखील बसला आहे.

असाच एक प्रकार पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे दि.९ रोजी दुपारी ४ वाजेपासून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे लोणी बुद्रुक येथे राहत असलेले शेतकरी किशोर विनायक पाटील, यांच्या शेतात वीज कोसळल्याने त्यांच्या मालकीचे एक गोऱ्हा व एक बैल या घटनेत मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. ही घटना कळताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली परंतु या विजेमुळे एक गोऱ्हा व बैल जागीच मृत्युमुखी पडले.

या घटनेप्रकरणी पशुधन विकास अधिकारी डॉ. शांताराम पाटील डॉ.असिफ कुरेशी व यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मयत गुरांचे शविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे जे दोन जणावरे मृत्युमुखी पडली. याबाबत शासनाने शेतकऱ्याला मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.