---Advertisement---
गुन्हे पारोळा

Parola : माहेरी गेलेल्या पत्नीला भेटला, घरी पायी जायला निघाला अन् तरुणासोबत घडलं विपरीत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२५ । पारोळा तालुक्यातील सावखेडे होळ मराठखेडेनजीक एक दुर्दैवी घटना घडली. माहेरी गेली असलेल्या पत्नीला भेटल्यानंतर घरी जाण्यासाठी पती पायी जात होता. मात्र त्याला भरधाव दुचाकी जोरदार धडक दिली. यात तरुणाचा मृत्यू झाला. दामु लोटन भिल (वय ३०) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव असून धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले आहेत. सदर घटनेप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp webp

या घटनेबाबत असे की, पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथील दामू भिल याची पत्नी नर्मदा ही एरंडोल तालुक्यातील मौजे पिंपळकोठा येथे माहेरी गेलेली होती, यामुळे तिला भेटण्यासाठी दामू हा २ मार्चला सकाळी १० वाजेच्या सुमारास बाभळेनाग येथून गेला होता. पत्नीची भेट घेत दिवसभर दोघांनी गप्पा मारल्या. यानंतर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पत्नीचा निरोप घेत दामू घरी जाण्यासाठी निघाला.

---Advertisement---

दामु भिल हा पिंपळकोठा ते बाभळेनाग गावी येण्यासाठी पायीच निघाला होता. या दरम्यान भालगाव फाटा ते मराठखेडा येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास पायी चालणाऱ्या दामू यास एरंडोलकडून पारोळाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारसायकलने जोरदार धडक दिली. यात दामू हा दूरवर फेकला गेला. यात त्याच्या डोक्यास गंभीर स्वरूपाची जखम होवून त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान घटनेनंतर दामू भिल यास पारोळा येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. तर धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. सदर घटनेप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment