XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही ; एकनाथ खडसेंच्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

सप्टेंबर 6, 2024 3:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२४ । ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आपल्या रखडलेल्या भाजप प्रवेशाबद्दल वाच्यता केली आहे. भाजपमध्ये जे पी नड्डा यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता, तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता. मात्र मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केल्याने तो जाहीर झाला नाही, असा गौप्यस्फोट खडसेंनी केली आहे. आता यावर भाजपच्या विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांना विचारले असता त्यांनी XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही, असे उत्तर दिले आहे.

munde khadse

त्या म्हणाल्या, अमूक राजकारणी काही म्हटला म्हणून मी त्यावर टिप्पणी करत नाही. मी भूमिकेवर राजकारण करतेय. काय काम झालं पाहीजे हे मी बघते. XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना ही खूप मोठी योजना आहे. लोकांना देखील ही योजना खूप आवडली आहे. आम्ही सगळे जरी कामाला लागलो तरी सर्वांपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे आमच्यात कुठंही चढाओढ नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now