Muktainagar News -जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगरमध्ये खडसे समर्थकाला मारहाणीचा प्रकार घडल्यामुळे मुक्ताईनगरचे राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकारामुळे काही खडसे समर्थकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले असल्याची परीस्थिती पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा सोशल मिडिया विभाग जळगाव यांनी काल शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे यांच्याकडे स्वत:सह परीवारास पोलीस सरंक्षण मिळण्यात यावं अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
खडसे समर्थक तथा राष्ट्रवादीचे सोशल मिडियाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांनी ही मागणी केली आहे. पाटील हे मुक्ताईनगर येथे कुटुंबासमवेत वास्तवास आहे. आमदार चंद्रकांत पाटील व त्यांचे साथीदार गुंड यांनी यापुर्वी माझ्या घरावर संगनमताने कट रचुन हल्ला केला होता. त्या संदर्भात मी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविला होता. परंतु, संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. संबंधितांचे मनोधेर्य खूपच वाढलेले आहे.
एवढेच नव्हे तर २२ जुलै रोजी संबंधितांनी आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आमिनखान याच्यावर जिवघेणा हल्ला करुन दिवसा ढवळ्या दोन भाडोत्री महिलांकरवी मारहाण केली. सबंधित हे सतत सोशल मिडीयाच्या माध्यमातून जिवघेण्या धमक्या देत असतात. यासंदर्भात मी पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी अर्ज केलेले आहेत. मागील वेळेस, त्यांनी माझ्या घरी येवून माझ्या पत्नीचा विनयभंग करुन आम्हांस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व यावेळी सुद्धा संगनमताने कट रचुन माझ्यावर हल्ला करण्याच्या बेतात आहे.
त्यामुळे माझ्या जिवितास धोका व असुरक्षितता निर्माण झाली आहे. म्हणुन मला पोलीस सरंक्षण देण्यात यावे. असे शिवराज पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच माझे वा माझ्या परीवाराचे काही एक बरे वाईट झाल्यास यास जबाबदार आमदार पाटील व त्यांचे गुंड साथीदार जबाबदार राहतील. असेही म्हटले आहे.