Breaking News : अरबी समुद्रात आढळली पाकिस्तानी बोट? सुरक्षा यंत्रणा सतर्क

जुलै 7, 2025 11:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२५ । काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील दहशवादी अनेक तळ उडविले होते. यानंतर युद्धाचे ढग कायमच तयार होत आहेत. पाककडून नापाक हरकत होण्याची शक्यता बाळगली जात असून अशातच देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरबी समुद्रात दोन नॉटिकल मैल अंतरात एक संशयीत बोट सापडली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यासह किनारपट्टी वरील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

sea

रेवदंडा नजीकच्या कोर्लई समुद्रात ही बोट आढळल्याचे समजतेय. ही बोट पाकिस्तानची असल्याचा प्राथमिक अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवला आहे. घटनास्थळी बॉम्ब डिस्पोजल पथक, क्यू आरटी फोर्स स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक कोस्ट गार्ड नौदल, सीमा शुल्क, यास अन्य फौज पोलीस फौज फाटा दाखल आहे.

रविवारी पोलिसांना आलेल्या अलर्ट नुसार अरबी समुद्रात आढळलेली संशयित पाकिस्तानी बोटीपर्यंत पोहचण्याचा सुरक्षा यंत्रणांचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. कारण खोल समुद्रात ही बोट आढळली असून वातावरणामुळे या बोटीपर्यंत पोहचणे शक्य झालेले नाही. रात्री या संशयित बोटीवर प्रकाश उघडझाप होत होता. उजडल्यानंतर आता ती संशयित बोट कोर्लई पासून 3 नॉटिकल सागरी मैलावर निदर्शनात येत नसल्याने आता ती बोट गेली कुठे याचा तपास सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे. बोट आढळून आली नसल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असून किनारपट्टीवर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

संशयित बोट दुपारी तीन वाजता थेरोंडा येथील जेट्टीवर आल्याचे लोकेशन सापडत आहे. परंतु अशी कोणतेही बोट थेरोंडा जेट्टीवर किंवा परिसरात आली नसल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. परंतु सुरक्षा यंत्रणेच्या रडारने ही संशयित बोट दाखल झाल्याचे लोकेशन शोधल्याने आता संशयित बोटीचे गुढ अधिक वाढले आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील संपूर्ण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, स्थानिक यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्च ऑपरेशनसाठी व्यापक योजना आखण्यात येत आहे. या बोटीमागे दहशतवादी कारवाया किंवा गुप्त हालचाली असल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे तपास अत्यंत गंभीरपणे घेतला जात आहे. नागरिकांनी शांतता राखत कुठलीही संशयास्पद गोष्ट दिसल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now