जळगाव लाईव्ह न्यूज । येथील पद्मश्री चैत्राम पवार नागरी सत्कार सोहळा समितीतर्फे गुरुवारी (२७ मार्च) केंद्र शासनातर्फे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावात शाश्वत – विकासाचे प्रयोग यशस्वी करून गावाचा सर्वांगीण विकास करणारे चैत्राम पवार यांचा नागरी सत्कार सोहळा होणार आहे, अशी माहिती आयोजन समितीचे किरण बच्छाव, आदर्श रजनीकांत कोठारी, किशोर पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील सेवाभारतीचे देवगिरी प्रांत सचिव डॉ. आनंद फाटक यांची उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नागरी सत्कार सोहळा ला. ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भय्यासाहेब गंधे सभागृहात २७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता होईल.
पद्मश्री चैत्राम पवार नागरी सत्कार सोहळा समितीत देवगिरी कल्याण आश्रमाचे जळगाव शहराध्यक्ष आदर्श रजनीकांत कोठारी, अॅड. भरत देशमुख, अॅड. नारायण लाठी, अनिकेत पाटील, दीपक चौधरी, अनिल भोकरे, डॉ. राजेश पाटील, डॉ. महेंद्र काबरा, संदीप काबरा, दिलीप गांधी, गिरीश सिसोदिया, डॉ. सुरेश पाटील, प्रमोद पाटील, सपन झुनझुनवाला, डॉ. रंजना बोरसे, डॉ. रेखा म हाजन, अॅड. महिमा मिश्रा, नीलेश चौधरी, डॉ. निरंजन चव्हाण, पी. आर. चौधरी यांचा समावेश आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन समितीचे अध्यक्ष किरण बच्छाव व सचिव अॅड. किशोर पाटील यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी बारीपाडा येथील इंद्रायणी तांदूळ, नाचणी , नवापूर येथील तूरडाळ , कल्याण आश्रम – साहित्य विक्रीसाठी उपलब्ध राहणार असून जनजाती क्रांतीकारकांची प्रदर्शनी, कल्याण आश्रम PPT. / Video पाहण्याची व्यवस्था असणार आहे
देवगिरी कल्याण आश्रमाचे सेवाकार्य
सेवाव्रती बाळासाहेब देशपांडेंनी १९५२ मध्ये छात्रावासाच्या माध्यमातून जशपूर (छत्तीसगड) येथून सुरू केलेले वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य आज संपूर्ण भारतात, पूर्वांचलपासून गुजरात आणि जम्मूपासून केरळपर्यंत पोहोचले आहे. जनजाती बांधवांचा सर्वांगीण विकास, त्यांचे अस्मिता जागरण हा उद्देश समोर ठेवून आज १६ हजार ४१३ स्थानी २१ हजार ९१७ प्रकल्पांद्वारे वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य गेल्या ७१ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. देवगिरी प्रांतात ६१२ प्रकल्पांच्या माध्यमातून यावर्षी २६ हजारांहून अधिक लाभार्थी असून, गेल्या ४५ वर्षांपासून केवळ समाजातील सर्व स्तरांतील लोकसहभागातूनच हे सेवाकार्य सुरू आहे.