---Advertisement---
आरोग्य जळगाव शहर

जळगावात २० हजारांवर मोकाट कुत्रे; मनपा म्हणतेय निर्बीजीकरणावर २ कोटी खर्च

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | १६ सप्टेंबर २०२३ | जळगाव शहरात मोकाट भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एक चिमुकला जखमी झाल्याची घटना घडली होती. जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव खूप मोठ्या प्रमाणात वाढला असून मोकाट कुत्र्यांच्या चाव्यात आबालवृद्धांसह अनेक जण जायबंदी होत आहेत. अशात जळगाव शहरात तब्बल २० हजारांवर मोकाट कुत्रे असल्याचे माहिती अधिकारांतर्गत प्राप्त आकडेवारीवरुन समोर आले आहे.

dogs in jalgaon jpg webp

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शहरातील विविध भागात अनेक बालके, नागरिक, महिला-पुरुषांसह वृद्धही जखमी झाले आहेत. कुत्रे चावल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. रस्त्यावरील कुत्रे वाहनाच्या मागे लागल्याने अनेक अपघातही घडत आहेत. दरम्यान, या समस्येवरुन माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी यासंदर्भात महापालिकेकडे माहितीच्या अधिकारान्वये माहिती मागवली होती. त्यातून गंभीर माहिती समोर आली आहे. मनपाच्या २०१९ च्या नोंदीनुसार शहरात सुमारे २० हजार मोकाट कुत्री आहेत.

---Advertisement---

यातील विशेष बाब म्हणजे, महापालिकेने मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर तीन वर्षांत दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. तरीही मोकाट कुत्र्यांचा उपद्रव कमी व्हायला तयार नाही. त्यामुळे हा खर्च नेमका गेला कुठे? असा प्रश्‍न उपस्थित होतोय. जळगाव शहरातील कुत्र्यांची संख्या तीन वर्षांपूर्वी जेवढी होती, त्यापेक्षा अधिक वाढली असल्याचे चित्र आहे.

पाळीव कुत्र्यांची माहिती नाही

मोकाट कुत्र्यांसह शहरात अनेकांकडे पाळीव कुत्रे देखील आहेत. मात्र या कुत्र्यांबाबत मनपाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पाळीव कुत्र्यांबाबत सर्वेक्षण झालेले नाही किंवा संबंधित कुत्र्यांच्या मालकांना नोटिसाही बजावलेल्या नाहीत. विशेष म्हणजे, कुत्री पाळणारे त्यांचे हौशी मालक त्यांच्या कुत्र्याला शौचासाठी इतरांच्या प्लॉटमध्ये, रस्त्यावर अथवा खुल्या जागेत घेऊन अन्य नागरिकांना त्रास होईल, असा प्रकार करतात. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---