संतापजनक! १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नोव्हेंबर 19, 2022 1:40 PM

Crime News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । जामनेर तालुक्यातील एका खेडेगावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून संतापजनक म्हणजे, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तरुणाविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 1 jpg webp

जामनेर तालुक्यातील एका गावात साडेसोळा वर्षीय पीडीता ही आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. या पीडीतेवर संशयीत जगदीश अशोक पवार याने गुन्हा दाखल होण्याच्या तीन महिन्यांपूर्वी वेळोवेळी लग्न करण्याचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडीत तरुणीने पहूर पोलिस स्थानक गाठत फिर्याद दिली.

त्यानुसार संशयित जगदीश पवार याच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories