⁠ 
शनिवार, मे 4, 2024

…अन्यथा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन – खा. उन्मेश पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम 2020 बाबत वारंवार पाठपुरावा करून देखील आजतागायत संबंधित विमा कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे २५ तारखेपर्यंत नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा विमा कंपीनीवर गुन्हे दाखल करावे. असे न केल्यास शेतकऱ्यांसाठी कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हाधिकारी अभित राऊत यांच्याशी चर्चा केली. याबाबत पत्रदेखील दिले आहे.

जिल्ह्यातील 1,62,861 शेतकऱ्यांनी विविध पिकांचा 1,56,725, क्षेत्रावरील विमा उतरविला आहे. त्यातील विमापोटी 28 कोटी 82 लाख 38 हजार 805 एवढी रक्कम भरली आहे. या योजनेत केंद्र शासन आणि राज्य शासनाने देखील त्यांचा वाट दिलेला आहे. मात्र या कालावधीत 10 हजार 150 शेतकऱ्यांना मंजूर झालेली नुकसान भरपाईची देण्यास टाळाटाळ करीत आहे. याबाबत वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र, कारवाई झाली नाही. जिल्ह्यातील 10 हजार 150 शेतकऱ्यांची थकित रक्कम 12% विलंब शुल्कासहित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे बाबत कळवावे, विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा न केल्यास गुन्हा दाखल करावा.अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिला आहे.

हे देखील वाचा :