⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु; वाचा सविस्तर

जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु; वाचा सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १८ ऑक्टोबर २०२३ | जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या १२८ रिक्त पदांसाठी निवडणुका होणार आहेत. ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यास २० ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

१६ ते २० ऑक्टोबर – अर्ज दाखल करणे
२३ ऑक्टोबर – अर्जांची छाननी
२५ ऑक्टोबर – अर्ज माघारी, चिन्हवाटप
मतदान – ५ नोव्हेंबर

उमेदवारांना ही कागदपत्रे आवश्‍यक

  • नामनिर्देशनपत्र नमुना अ (नियम ८)
    (सर्व फॉर्मवर स्वाक्षरी असणे बंधनकारक)
  • उमेदवाराने करावयाचे घोषणापत्र क्रमांक १
    (वयाबाबत ग्रा. पं. ठेकेदार नसलेबाबत व थकबाकी नसलेबाबत)
  • उमेदवाराने करावयाचे घोषणापत्र क्रमांक २
    (जातप्रवर्गाबाबत जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र)
  • नावात बदल (स्त्री असेल तर) शपथपत्र
    -परिशिष्ट – २
    (अपराधाबद्दल, जंगम मालमत्ता, दायित्वबाबत, शैक्षणिक अर्हता व पडताळणीचे घोषणापत्र)
    -अपत्याचे घोषणापत्र
    शौचालय असलेबाबत स्वयंघोषणापत्र
    ग्रामपंचायत ठेकेदार नसलेबाबत स्वयंघोषणापत्र
    जातीचा दाखला
    जात वैधता प्रमाणपत्र
    हमीपत्र (परिशिष्ट- २) खर्चाचा दैनंदिन अहवाल
    निवडणूक खर्च १ महिन्याचे आत देणेबाबत हमीपत्र
    चिन्हांच्या प्राधान्यक्रमांचा नमुना (नमुना -अ)
    मतदार यादीची प्रत
    (त्याच प्रभागात नाव नसल्यास) प्रमाणित प्रत
    नवीन बँक खाते पासबुक झेरॉक्स
    दोन फोटो व नमुना स्वाक्षरी (उमेदवार)
    वयाचा पुरावा
    ओळखीचा पुरावा
    शैक्षणिक अर्हता
    रहिवासी दाखला (वास्तव्याचा दाखला)
    अनामत रक्कम भरल्याची पावती

तालुकानिहाय ग्रामपंचायती

पारोळा तालुक्यात ११. ठिकाणी सार्वत्रिक तर ९ ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहे. भडगाव तालुक्यात ८ सार्वत्रिक व ५ पोटनिवडणुका, अमळनेर तालुक्यात १४ सार्वत्रिक व ११ पोटनिवडणुका, चाळीसगाव तालुक्यात १२ सार्वत्रिक व १० पोटनिवडणुका, भुसावळ तालुक्यात ७ सार्वत्रिक व ४ पोटनिवडणुका, पाचोरा तालुक्यात ४ सार्वत्रिक व १४ पोटनिवडणुका, एरंडोल तालुक्यात ७ सार्वत्रिक व ३ पोटनिवडणुका, रावेर तालुक्यात १३ सार्वत्रिक व २१ पोटनिवडणुका, जामनेर तालुक्यात १७ सार्वत्रिक व २० पोटनिवडणुका, चोपडा तालुक्यात २२ सार्वत्रिक व ४ पोटनिवडणुका, जळगाव तालुक्यात १५ सार्वत्रिक व ४ पोटनिवडणुका, मुक्ताईनगर तालुक्यात ४ सार्वत्रिक व ४ पोटनिवडणुका, यावल तालुक्यात ४ सार्वत्रिक व ४ पोटनिवडणुका, धरणगाव तालुक्यात १८ सार्वत्रिक व ३ पोटनिवडणुका अशा एकून १६७ सार्वत्रिक व १२८ पोटनिवडणुका होत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह