⁠ 
सोमवार, मे 27, 2024

मोठी बातमी! प्रवाशांनी खचाखच भरलेली पुणे-रावेर बस अजिंठा घाटात उलटली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२४ । राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी गाड्यांची स्थिती अत्यंत वाईट असून यात एसटीला होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामुळे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहेत. ६६ प्रवाशांना घेऊन जाणारी बस अजिंठा घाटात उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली असून या अपघातात ६ ते ८ प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

याबाबत असे की, रावेर आगारातील बस क्रमांक (एमएच ४० वाय ५१९७) ही बस पुणे ते रावेर असा प्रवास करत होती. याच दरम्यान छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात बस पलटी झाली. समोरून मालवाहू टेम्पो क्रमांक (एमएच २० जीसी ७८४०) ला दुसरी बस ही तिच्या मागून ओव्हर टेक करत होती. त्यावेळी पुणे-रावेर बसवरील चालकाचे बसवरील ताबा सुटला. त्यामुळे धावती बस रस्त्याच्या पलीकडे जावून ७ फूट खाली जावून पटली झाली.

या बसमध्ये एकुण ६६ प्रवाशी होते. त्यापैकी ६ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंत अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तसेच जखमींचे नावे देखील समोर आलेले नाही.