⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव तालुक्यात प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन, कधी आणि कुठे होणार?

जळगाव तालुक्यात प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन, कधी आणि कुठे होणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२३ । जळगाव तालुक्यातील वडनगरी येथील बड़े जटाधारी महादेव मंदिर ट्रस्टतर्फे ५ ते ११ डिसेंबरदरम्यान वडनगरी फाट्याजवळ पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेच्या आयोजनाच्या तयारीला वेग आला असून, ३०० एकर शेतात कथेचे नियोजन केले जात आहे. कथेचे आयोजन भरत चौधरी, जगदीश चौधरी, तुषार चौधरी यांच्यासह पंचकोशीतील शिवभक्तांकडून करण्यात आले आहे.

राज्यासह मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमधून सुमारे ७ लाखांहून अधिक भाविक या कथेसाठी येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. या कथेच्या आयोजनासाठी आयोजन समितीकडून जोरदार तयारी सुरू असून, वडनगरी गावाच्या फाट्याजवळील ३०० एकरची जागा तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. आयोजन समितीकडून ३० हून अधिक उपसमित्या तयार करण्यात आल्या आहेत. राज्यभरासह इतर राज्यांमधून येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या पाहता, भाविकांसाठी राहण्याची व जेवणाचीही व्यवस्था आयोजकांकडून केली जात आहे. यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

५ ते ११ डिसेंबर दरम्यान राहणार कथा
५ ते ११ डिसेंबरदरम्यान दररोज दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान शिवमहापुराण कथेचे वाचन केले जाणार आहे.
४ डिसेंबर रोजी कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचे जळगाव शहरात आगमन होणार असून, ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव रेल्वे स्टेशन ते वडनगरी फाट्याजवळील बड़े जटाधारी महादेव मंदिरापर्यंत प्रदीप मिश्रा यांची शोभायात्रा काढण्यात येणार असून, वा शोभायात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.