⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

गोदावरी अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी फिनिक्स २०२२ चे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या कलागुणांच्या बळावर मनाच्या आत दडलेल्या प्रतिमेला एक नवे वळण मिळावे या उदात्त हेतुने गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये फिनीक्स २०२२ (टेक्नीकल डव्हेंट) व उल्हास २०२२ (स्नेह संमेलन) चे आयोजन १२ व १३ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलित, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात फिनीक्स २०२२ चे आयोजन दि.१२ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. फिनीक्स २०२२ हा एक विद्यार्थ्यांसाठीचा टेक्नीकल इव्हेंट असुन त्यात विविध प्रकारच्या इव्हेंटचा समावेश केलेला आहे. त्यात शार्क टैंक, मिनी हॅकेथॉन, क्विझ स्टार, जंक यार्ड व अ‍ॅडमॅड शो अशा प्रकारचे इव्हेंट आहेत. या टेक्नीकल इव्हेंट ला जळगांव जिल्हा तसेच धुळे, मलकापुर, बुलढाणा, नंदुरबार या भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये सहभाग नोंदविला आहे. विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयामार्फत प्रथम पारितोषीक ३,००० रु. द्वितीय पारितोषिक २,००० रु.व तृतीय पारितोषिक १,००० रु असे बक्षिसासह प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुख व समन्वयक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. तरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार यांनी केले आहे. फिनिक्स २०२२ या टेक्नीकल इव्हेंटचे समन्वय प्रा.माधुरी झंवर आहेत. ट्रॅडिशनल डेमध्ये विद्यार्थी करणार धमाल महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी व कला दर्शनासाठी उल्हास २०२२ चे आयोजन दि.१३ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आले आहे. त्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी सहभाग नोंदविणार आहेत.

यात सुरुवातीला ट्रॅडिशनल डे (पारंपारीक वेशभुषा) चे आयोजन करण्यात आले आहे व त्यानंतर शेला पागोटे हा कार्यक्रम घेणार आहे. तसेच संध्याकाळी कल्चरल नाईट हा कार्यक्रम होईल. यात विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार, गायन कौशल्य, एकांकिका असे विविध प्रयोग सादर होणार आहे. या स्नेहसंमेलनाचे समन्वयक हे प्रा.प्रशांत शिंपी यांच्यासह समित्यांचे प्रमुख व विद्यार्थी परिश्रम घेत आहे.