जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव वीरर्शैव लींगायत गवळी समाजाचा सामूहिक शिवदीक्षा संस्कार सोहळा रविवार दि. 8मे आयोजित करण्यात आला आहे. दीक्षेशिवाय कोणत्याही विरशैवाला मोक्षप्राप्ती होत नाही अशी लिंगायत गवळी समाजाची धारणा आहे.
या कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे दि. ७मे रोजी दुपारी ४ वाजता शेकडो कलशधारी माता भगिनींच्या व भाविकांच्या उपस्थितीत धर्मगुरूंची सवाद्य मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक चाळीसगाव येथून वाजत गाजत निघणार आहे. त्यानंतर रविवारी 8 रोजी सकाळी होम हवन दुपारी सामूहिक दीक्षा संस्कार त्यानंतर गुरूंचे आशीर्वचन आणि महाप्रसाद कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागत समिती सदस्य राजेंद्र दगडू गोडळकर, बाळाप्पा काशिनाथ चिपडे, तुकाराम आण्णा सिदाप्पा लगडे, सुभाष वाल्मिकी निस्ताने, काशिनाथ रोडमल नामदे, तान्हाजी किसन दहीहंडे, लक्ष्मण गंगाधर मिसाळ, राम घुगरे, रमेश लक्ष्मणराव हुचे हे आहेत.