⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

एरंडोलात शेतकरी संवेदना अभियानातंर्गत बँक समाधान मेळावाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । एरंडोलातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी संवेदना अभियानातंर्गत बँक समाधान मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ९ रोजी सकाळी ९ ते ११ वाजता पंचायत समिती एरंडोल येथे, तर सायंकाळी ४ ते ६ वाजता रिगणगांव येथे, दि. १० रोजी कासोदा येथे ९ ते ११ वाजता, तर सायंकाळी ४ ते ६ उत्राण येथे होणार आहे.

या मेळाव्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना वित्त पुरवठयाबाबत माहिती देणे तसचे थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना OTS किंवा कर्जाचे नविनीकरण ( Renewal ) चा पर्याय सहजपणे उपलब्ध करुन पुन्हा नविन कर्जासाठी मदत करणे असा असून याबाबत बँकाचे शाखा प्रमुख हे या मेळाव्यास माहिती देणार आहेत. त्या अनुषंगाने महसूल मंडळ स्तरावर खालील प्रमाणे शेतकरी संवेदना अभियाना अंतर्गत ” बँक समाधान मेळावे ” आयोजित करण्यात येत आहेत. सदर मेळाव्यात थकीत कर्ज असणारे शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामस्तरीय कर्मचारी, प्रतिष्ठित नागरीक सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन तहसिलदार एरंडोल यांनी केलेआहे.