भगवान परशुराम जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

एप्रिल 26, 2022 12:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ एप्रिल २०२२ । येथील बहुभाषीक ब्राह्मण महासंघातर्फे यंदा देखील भगवान परशुराम जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

परशुराम जयंती

बहुभाषीत ब्राह्मण महासंघातर्फे भगवान परशुराम जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदादेखील भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात १ मे रोजी भव्य दुचाकी रॅली तर ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील रथ चौकातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात विविध भाषा बोलणारे तसेच विविध शाखांमधील ब्राह्मण बांधव सहभागी होणार आहे.

दि १ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता संभाजी चौकापासून दुचाकी रॅलीची सुरवात होईल. बालगंधर्व खुले नाट्यगृह या ठिकाणी समारोप होईल. यानंतर, ३ मे रोजी रथचौक राम मंदिर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून बालगंधर्व नाट्यगृह येथे शोभायात्रेचा समारोप होईल. दरम्यान, भगवान परशुराज जयंती उत्सवासाठी विविध कार्य समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात ४०० स्वयंसेवकांचा समावेश आहे. तर शोभायात्रेत सहभागी होणार्‍या ढोल पथकाचा सराव शिवतीर्थ मैदानावर सुरू आहे.

भगवान परशुराम जयंती उत्सवासाठी बहुभाषीक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष अजित नांदेडकर, महिला अध्यक्षा मनिषा दायमा, नियोजन समिती प्रमुख श्रीकांत खटोड, लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, सुधा खटोड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now