⁠ 
रविवार, मे 19, 2024

वाचन प्रेरणा दिनानिमित्त डिजिटल अभिवाचन स्पर्धेचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेतर्गत मराठी साहित्यातील ललित लेखन या विषयावर डिजिटल अभिवाचन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबर या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचनाच्या प्रवासात ज्या ललितलेखांनी अनेकांना समृद्ध केलं अशा लेखांचं अभिवाचन तसेच वाचनाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी राज्य मराठी विकास संस्था व मिती क्रिएशनच्यावतीने सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून याचे खालील प्रमाणे अंतिम दि, विषय,नियम व अटी आहेत.

नियम आणि अटी
मराठी साहित्यातील निवडक ललित लेखाचं अभिवाचन करतानाचा ५ मिनिटाचा व्हिडीओ स्पर्धकांनी abhivachan.miti@gmail.com या इमेल वर पाठवावा.

हि स्पर्धा ३ गटात होईल. स्पर्धेचे ३ गट –
गट क्र. १ : वयोगट ५ ते १५
गट क्र. २ : वयोगट १५ ते ३०
गट क्र. ३ : वयोगट ३० वर्ष आणि पुढे
व्हिडीओ पाठवताना आपलं संपूर्ण नाव, ठिकाण, फोन नंबर आणि स्पर्धेचा गट ही सर्व माहिती मेल मध्ये नमूद करावी.
(स्पर्धकांनी या माहितीशिवाय मेल पाठवले तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत)
व्हिडीओ करताना फोन आडवा धरावा. अभिवाचन सुरु करण्याआधी आपलं नाव सांगावं आणि तुम्ही जे अभिवाचन करणार आहात त्या कलाकृतीचंही नाव सांगावं.

व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख – १० ऑक्टोबर

बक्षिसांचं स्वरूप रोख रक्कम, प्रशस्ती पत्रक आणि पुस्तकं असं असेल.
विजेत्या स्पर्धकांच्या अभिवाचनाचे व्हिडीओ कार्यक्रमात वापरले जातील आणि इतर काही निवडक स्पर्धकांच्या अभिवाचनाचे व्हिडीओ राज्य मराठी विकास संस्थेच्या फेसबुक पेजवर, मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर आणि युट्युब चॅनलवर, तसंच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल असे सांगितले.