जळगाव जिल्हा
सावद्याला रविवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । सावदा येथे आदिवासी सेवा मंडळ , दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र जळगाव, आणि आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजीनियरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत दि.७, रविवार रोजी सकाळी ११ वाजता येथील नगरपालिका बहुउद्देशीय हॉल कोचुर रोड येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक वासुदेव पाटील, प्राध्यापक उमेश सूर्यवंशी, प्राध्यापक कपिल देव कोळी, प्राध्यापक मदन बनसोडे हे मार्गदर्शन करणार आहे. या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.