⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्या, नागरिकांची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । विनोद कदम । अमळनेर शहरातील लक्ष्मीनगर भागातील पाण्याच्या टाकीजवळील भागात कायमस्वरूपी मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी येथील नागरिकांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लक्ष्मीनगर मध्ये पाण्याच्या टाकी समोरील भागात व समोरील गल्लीत गट नंबर 1751 मध्ये कुठल्याही नागरी सुविधा उपलब्ध झालेली नाही. आमचे लक्ष्मीनगर पाण्याची टाकी समोरील भागात रहिवास साधारणतः  30 ते 35 वर्षापासून असून आम्ही नगरपालिका कराचा भरणा नियमितपणे करीत आलो आहोत. पोट गटारी नसल्याने सांडपाणी शोष खड्डे भरून रस्त्यावर वाहत आहेत. यंदा पावसाळ्यात तर कहरच झाला. साधारणपणे दोन ते तीन मीटर पर्यंत पाणी आमच्या कॉलनीत साचलेले होते. मंदिराच्या परिसरात देखील गुडघ्याच्या वर पाणी होते. त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर झाला होता त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी वाढून मलेरिया डेंगू यासारखे आजार पसरण्याची दाट शक्यता होती. आता देखील तशी साथ सुरू आहे. त्यामुळे लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकी समोरील व मंदिराच्या पाठीमागील भागाचा प्रत्यक्ष सर्वे करून जागेची तपासणी करावी व वंचितांना कायमस्वरूपी मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी केली आहे.

यावेळी राजू फाफोरेकर, अनिल ठाकूर, एस बी पाटील, भालचंद्र बाविस्कर, रवींद्र मुसळे, केवलसिंग राजपूत, चंद्रकांत पाटकरी यांनी दिले. निवेदनावर त्या भागातील रहिवासी संदीप मोरे, तुषार मोरे,  विजय राणे, रवींद्र मुसळे, रतनलाल बिचवे , संजय वानखेडे, दीपक बोरसे, प्रल्हाद बोरसे, रवींद्र वानखेडे, सुनील सोनवणे,रामदास पवार, अरुणाबाई पाटील, मनीषा पाटील, उज्वला मोरे, सुनंदा शिरसाठ, गुलाब शिंदे, कविता वानखेडे, रवींद्र वानखेडे, वनिता सिसोदे, सखाराम पाटील, हिंमत चौधरी यांच्या सह्या आहेत.

हे देखील वाचा :