गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ‘अंतरंग २ के २४’ क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या ‘अंतरंग २घ२४’ क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आजपासून भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा समारोप दि. २ जानेवारी रोजी फ्रेशर्स पार्टी व वार्षिक स्नेहसंमेलनाने होणार आहे.
उत्सवाची सुरुवात संस्थाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते अंतरंग २के२४ लोगोे अनावरण व मशालीद्वारे ज्योत प्रज्वलनाने करण्यात येईल. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, हृदय रोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, शल्यचिकित्सक डॉ. अनिकेत पाटील यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरूड, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील स्कूल ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रा. शिवा बिरादर आणि प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे यांची विशेष उपस्थिती असेल.कार्यक्रमाची सुरुवात खेळाडूंच्या भव्य मार्च पास्टने होईल, ज्यामध्ये संप्तरंगी फुगे आकाशात सोडण्यात येतील. त्यानंतर खेळाडूंचा परिचय मान्यवरांना करून देण्यात येईल व क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ श्रीफळ वाढवून होईल.
असे आहे कार्यक्रमाचे वेळापत्रक: दि. २८ डिसेंबर उद्घाटन व प्रारंभ, दि.२९ डिसेंबर चॅम्पियन्स लीग व विविध क्रीडा स्पर्धा दि. ३० डिसेंबर फूड कार्निव्हल दि. ३१ डिसेंबर डीजे नाईट दि.१जानेवारी रोजी जानेवारी नाईट दि. २ जानेवारी फ्रेशर्स पार्टी व सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्नेहसंमेलनाचा समारोप उत्साहात होणार आहे. या उत्सवाचे आयोजन अभ्युदय बॅचच्या विद्यार्थ्यांनी केले आहे.