ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे ‘या’ पदांसाठी भरती ; ‘एवढा’ पगार मिळेल

Ordnance Factory Bhandara Bharti 2023 : ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 असणार आहे.

रिक्त पदाची संख्या – 09

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदवीधर शिकाऊ : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Engineering Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ शिकाऊ : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Engineering Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका पगार मिळेल?
पदवीधर शिकाऊ – 9,000/- रुपये प्रतिमहिना
तंत्रज्ञ शिकाऊ – 8,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : आयुध कारखाना भंडारा, जवाहरनगर, भंडारा, साहुली, महाराष्ट्र 441906.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023

Ordnance Factory Bhandaraअधिकृत संकेतस्थळ : www.ofbindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा