तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तयार करण्याचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । सार्वजनिक स्वच्छतागृह वापरताना तृतीयपंथी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महाविद्यालयांच्या आवारात तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तयार करण्यात यावे, असे आदेश उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने दिले. हे आदेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला प्राप्त झालेले आहे. त्या आदेशाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे.
तृतीयपंथी व्यक्तींना माणूसकीची वागणूक देवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने विद्यापीठ व महाविद्यालयांनी त्यांना वेगळी वागणूक न देता सर्वसामावेशक शिक्षणपध्दतीचा अवलंब करावा तसेच अशा व्यक्तींसाठी स्वच्छतागृहांची निर्मिती करावी, जेणे करून अशा व्यक्तींना कुठल्याही समस्येला तोंड देता येणार नाही, असे उच्च शिक्षण संचालनालयाच्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, नुकतेच हे आदेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला प्राप्त झालेले आहे. त्या आदेशाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व प्रकारच्या अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना दिल्या आहेत.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यातील सीसीआय केंद्राची मुदत वाढवण्यासाठी कॉंग्रेसचे आंदोलन
- शेतकऱ्यांनो सावधान! सायबर चोरट्यांकडून शेतकऱ्यांची होतेय अशी फसवणूक? बातमी वाचाच..
- मोठी बातमी ! चाळीसगाव तालुक्यातील नागद रोड परिसरातील तीन ते चार घरांना भीषण आग
- फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेसाठी खेळाडू व एनसीसी विद्यार्थ्यांच्या गुण सवलतीसाठी प्रस्ताव सादरीकरणाच्या अंतिम तारखा जाहीर
- जळगावात घरासमोर लावलेली रिक्षा पेटवली; अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल