Friday, December 9, 2022

स्पर्धा परीक्षेमध्ये जिद्द आणि चिकाटीच यश मिळवून देऊ शकते : कुमार चिंता

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । जिद्द व चिकाटीने स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चित यश मिळवता येऊ शकते. सातत्य व परिश्रमाच्या बळावर यश खेचून आणता येते,असे मत जळगावचे पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांनी मांडले. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

- Advertisement -

जळगाव शहरातील रायसोनी इस्टीट्यूटच्या वतीने कुमार चिंता यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. रायसोनी इस्टीट्यूटचे ऑकेडमिक डीन प्रा.डॉ.प्रणव चरखा यांनी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांचा सत्कार केला. डॉ. प्रणव चरखा यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व रायसोनी इस्टीट्यूटच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  

आपल्या ‘येस यू कॅन’ या विषयावरील व्याख्यानात चिंता यांनी मुलांना मार्गदर्शन केले. ‘वेळेचे नियोजन करा व ध्येयाचा जिद्दीने व चिकाटीने पाठपुरावा करावा,’ असा सल्ला त्यांनी दिला. त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणेही दिली. ‘पोलीस विभाग सक्रिय करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी सहकार्य केले पाहिजे,’ असेही त्यांनी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांना विविध सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांचाही विकास व्हावा याबद्दल आपण आग्रही आहोत, हेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांनी कुमार चिंता यांना सूचक प्रश्न विचारून मुलाखतवजा चर्चा केली. या प्रश्नांना चिंता यांनी त्यांच्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत उत्तरे दिली. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाविदयालयाच्या ऑडमिशन डीन प्रा.प्रिया टेकवाणी यांनी केले.

- Advertisement -

कार्यक्रमात सुमारे दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन रायसोनी इस्टीट्यूटचे जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूट चे संचालक प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

हे देखील वाचा :

- Advertisement -
[adinserter block="2"]