जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । क्रेडिट कार्डद्वारे परस्पर कर्ज घेतल्याचे दाखवून ३९ वर्षीय शिक्षकाला १ लाख १९ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहा शेख अमिनोद्दीन (वय ३९) हे भवानी पेठ जळगाव हे वडील व मुलीसह वास्तव्याला आहेत. उर्दू शाळेत ते शिक्षक म्हणून नोकरीला आहे. त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये अर्ज केला होता. त्यांना ऑक्टोबर २०२१ मध्ये क्रेडिट कार्ड पोस्टाद्वारे मिळाले. फरहा शेख यांनी अद्यापपर्यंत क्रेडिट कार्डचा कोणताही वापर केलेला नाही.

दरम्यान, १७ जानेवारी रोजी क्रेडिट कार्डच्या कस्टमर केअरमधून फोन आला व सांगितले की, तुम्ही घेतलेल्या १ लाख १९ हजार रुपयांचे लोनचे दोन हप्ते थकीत आहे, ते लवकरात लवकर भरा, असे सांगण्यात आले. परंतु त्यांनी कर्ज घेतलेलेच नसल्याने त्यांनी बँकेत धाव घेऊन चौकशी केली असता वेगवेगळे दोन ठिकाणी कर्ज घेतल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.
हे देखील वाचा :
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त






