लाडकी बहीण योजनेचा एका वर्षातील खर्च आला समोर; आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

ऑक्टोबर 28, 2025 11:19 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२५ । विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या कोट्यवधी महिला या योजनेचा लाभ घेत असून या योजनेद्वारे दरमहा पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होत आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी एका वर्षात राज्य सरकारने ४३ हजार कोटी रुपये खर्च केले आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही आकडेवारी समोर आणली आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही आकडेवारी समोर आणली आहे.

ladki bahin

जुलै २०२४ ते जून २०२५ या कालावधीत जवळपास ४३,०४५.०६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने ३६००० कोटी रुपयांचा निधी ठेवला होता. मात्र, सरासरी ३,५८ कोटी रुपये खर्च झाला. त्यामुळे तेव्हापासून सरकारी तिजोरीवर ताण पडण्यास सुरुवात झाली.

कोणत्या महिन्यात किती रुपये खर्च
जुलै २०२४ ते जून २०२५ या काळात ४३,०४५.०६ कोटी रुपये वितरीत करण्यात आले
एप्रिल महिन्यात सर्वाधिक महिला लाभार्थी होत्या. २.४७ लाख महिलांना १५०० रुपये देण्यात आहे.
जून महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली. पडताळणीमधून हजारो महिलांना बाद करण्यात आले.
योजनेतून ७७,९८० महिला बाद करण्यात आल्या त्यामुळे सरकारची ३४०.४२ कोटींची बचत झाली.

लाडकी बहीण योजनेचा निधी हा ठरवलेल्यापेक्षा जास्त लागला आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण आला आहे. याचा परिणाम इतर योजनांवरदेखील झाला आहे. इतर अनेक योजना बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ही योजना बंद होणार की काय असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, ही योजना सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now