जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । चोपडा शहरातील बस स्थानकाजवळ ओमिनी चालकाकडून दरोडेखोरांनी ६ हजार ३०० रुपये रोख पळवून नेले होते. सोमवारी सकाळी ही घटना घडली होती. या घटनेत शहर पोलिसांनी संशयित भामट्याला अटक करत त्याची चोपडा शहर पोलिसांनी मंगळवारी मुख्य बाजारपेठेतून धिंड काढली.

फिर्यादी हारून शेख कमरोद्दीन यांची ओमिनी कार (क्र.एम.एच.१९-०९२९) संशयित भैय्या पाटील याने, चोपडा बस स्थानकाजवळ अडवली. तर तीन अनोळखी संशयितांनी त्यांना शिविगाळ व दमदाटी केली. तसेच टकल्या गवळी याने मारहाण केली होती. संशयितांनी फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील ६ हजार ३०० रुपये हिसकावून घेतले होते. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेतील संशयित भामट्याला अटक करत त्याची धिंड काढली. इतर चार संशयित पसार आहेत. संशयित गवळीला अमळनेर न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
हे देखील वाचा :
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त






