⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

अमळनेरात कोरोनाने घेतला आधुनिक श्रावणबाळाचा बळी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ एप्रिल २०२१ । कोरोनाच्या काळात आई वडिलांची सेवा करणाऱ्या कलियुगातील श्रावण बाळाला कोरोनाचा बाण लागून त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना 6 रोजी सकाळी घडली.

शहरातील तांबेपुरा भागातील रहिवासी सुखदेव भालेराव हे सेवानिवृत्त शिक्षक आणि त्यांच्या पत्नी पुष्पबाई  भालेराव याना 17  मार्च रोजी  कोरोनाची लागण झाली होती. त्यांची मुलगी रंजनाबाई ही डॉ नितीन पाटील यांच्याकडे परिचारिका आहे. तिने आई  वडिलांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांची काळजी घेतली. तिचा भाऊ प्रवीण याला देखील आई वडिलांसाठी दोन्ही बहिणी धावपळ करत असल्याचे समजताच तो देखील आई वडिलांच्या सेवेला हजर झाला आणि हळूहळू त्याला देखील कोरोनाची लागण झाली बहिणीने भावाचीही जबाबदारी स्वीकारली पैसे नसल्याने त्यालाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

आणि आई वडिलांना बरे करून भावाच्या सेवेसाठी रात्रदिवस रुग्णालयात हजर होती पण अखेर आई वडिलांच्या सेवेसाठी हजर झालेल्या आधुनिक श्रावण बाळाचा कोरोनाच्या घातक आणि दुर्दैवी बाणाने वेध घेतला. म्हाताऱ्या आई वडिलांना बरे करून मुलगा मात्र सोडून गेला.