जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । पत्नीकडे आलेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी जळगाव शहरातील कांचन नगरमध्ये उघडकीस आली आहे. रविंद्र केशव सुर्यवंशी (वय-४०) रा. तुरखेडा ता. जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, जळगाव तालुक्यातील तुरखेडा येथे रविंद्र सुर्यवंशी हा मुलगा दिपक सुर्यवंशी याच्यासोबत राहत होता. तर त्यांची पत्नी सुरेखा सुर्यवंशी या जळगाव शहरातील कांचन नगरात वास्तव्याला आहे.त्या भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुलगा दिपक हा पत्नी सुरेखाकडे राहण्यासाठी आला होतो. त्यामुळे त्याला घेण्यासाठी रविंद्र सुर्यवंशी हे सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याला घेण्यासाठी कांचन नगर येथील पत्नीच्या घरी आले होते. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पत्नी सुरेखा ह्या कामानिमित्त बाहेर गेले असतांना रविंद्र यांनी घराचा दरवाजा आत बंद करून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
यासंदर्भात पत्नी सुरेखा व मुलगा दिपक हे घरी आले असता दरवाजा आतून बंद होता. शेजारचांच्या मदतीने दरवाजा उघडून पाहिले तर रविंद्र सुर्यवंशी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अभिजित सैंदाणे करीत आहे.
हे देखील वाचा :
- ‘एमपीएससी’त यशाने दिली हुलकावणी, नैराश्यातून तरुणाने बहिणीच्या घरी मृत्यूला कवटाळले
- Mansoon Update : जळगाव जिल्ह्यात उद्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता
- लग्न ठरले, अपघात झाला, ‘त्या’ला अपंगत्वाचा धोका दिसू लागला, ‘ती’ ठाम राहिली अन् विवाह पार पडला
- भाजपातर्फे रावेरमध्ये राज्य शासनाचा निषेध
- Modi @ 8: मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण, PM मोदी ‘या’ 8 योजनांनी घराघरात लोकप्रिय!
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज