सावद्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाची दुचाकी लांबविली

सप्टेंबर 22, 2022 5:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । सावदामध्ये मोटारसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. असाहतच येथील वर्दळीच्या बस स्टॅन्ड जवळील हॉटेल चंद्रमा जवळून सावदा येथील ओम कॉलनीतील रहिवासी संजय वामन नेहेते यांची मोटरसायकल चोरीस गेली. याबाबत संजय वामन नेहेते यांचे फिर्यादी वरून सावदा पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

bike

सावदा येथील ओम कॉलनीतील रहिवासी संजय वामन नेहेते यांची रेड वाईन कलरची बजाज फोरएस चॅम्पियन गाडी क्रमांक एम.एच. 19, ए. एन. 2919 ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लांबविली. याबाबत संजय वामन नेहेते यांचे फिर्यादी वरून सावदा पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे , तपास सावदा पोलीस करीत आहे, दरम्यान शहरात मागील काही महिन्यात मोटर सायकल चोरीच्या घटना घडल्या असून येथील रविवारी भरणाऱ्या आढवडे बाजारातून देखील अनेकदा नागरिकांच्या मोटारसायकल चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहे,.

तर सदर मोटार सायकल ज्या ठिकाणाहून चोरीस गेली तेथे आजूबाजूला सी.सी.टीव्ही कॅमेरे असून याव्दारे चोरट्याचा मागमूस लागू शकतो यादृष्टीने देखील तपास होणे आवश्यक असून, शहरात अनेक ठिकाणी सध्या सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून याचा उपयोग अश्या घटना मध्ये पोलीस यंत्रणा यांनी करणे अपेक्षित असून याघटनांना लगाम घालणे देखील पोलिसांना आवश्यक झाले आहे,

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now