बनावट नोटांसह एकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या ; खान्देशात खळबळ

नोव्हेंबर 1, 2025 4:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी धुळ्यात एकाला शंभर व पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केल्यानं धुळे शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.

fake note

धुळे तालुका पोलिसांना बनावट नोटा आपल्या सोबत बाळगून असल्याचे खात्रीला सूत्रांतर्फे माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी सापळा रचून सदर संशयीताला ताब्यात घेतले असता त्याकडे १०० आणि ५०० च्या बनावट नोटा मिळून एकूण २२,२०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.

संशयित आरोपी हा विदर्भातील असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले असल्याने मोठे रॅकेट यामागे सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या कारवाईमुळे धुळे शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही घटना उघड झाल्याने प्रशासनही सतर्क झालं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now