⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगाव शहरातील दुचाकी चोरीचे सत्र थांबेना ; पुन्हा दोन दुचाकी लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२१ । शहरातून दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातून पुन्हा दोन दुचाकी चोरीस गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

पहिल्या घटनेत ११ एप्रिल रोजी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोरून २५ हजार रुपयांची दुचाकी चोरीस गेली. रमेश पुंडलिक चौधरी (वय ५६, रा. विठ्ठलपेठ) यांच्या मालकीची ही दुचाकी (एमएच १९ बीएल ८४२३) आहे. चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच १४ एप्रिल रोजी रात्री १ वाजता कालिंका माता चौकातील रसवंती समोरुन पंकज वसंत माळी (वय ३२) यांची दुचाकी (क्रमांक एमएच १९- एक्स ११२२) ही चोरीस गेली. माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनि पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याघटनांवर पोलिसांना नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. त्या अनुशंगाने १७ एप्रिल रोजी सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवून संशयित वाहनांची तपासणी केली. यात २८ संशयित दुचाकी जप्त केल्या. यातील काही चोरीच्या असल्याचा संशय आहे. दुचाकी ताब्यात मिळुन आल्या आहेत, त्यांना मुळ कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.