⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

दुसऱ्या दिवशी ४५० विद्यार्थ्यांनी दिली पेट परीक्षा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजे पेटच्या दुसऱ्या दिवशी ७७३ विद्यार्थ्यांपैकी ४५० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली.

विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा केंद्रात १८ ते २२ एप्रिलपर्यंत या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. सदर परीक्षेला एकूण ३ हजार ६८८ विद्यार्थी बसले आहे. या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात असून, त्यासाठी २५० संगणकांची व्यवस्था करण्यात आली आहे. एका दिवसात ४ बॅचेसमध्ये या परीक्षा होत आहे. मंगळवारी दिवसभरात चार बॅचेससाठी ७७३ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी ४५० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.