⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल व पारोळात विविध उपक्रम!

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांच्या माध्यमातून एरंडोल येथे भव्य रोग निदान शिबिर तर पारोळा येथील कृष्णा हॉस्पिटल येथे शेती फवारणी पंप वाटप आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

रोगनिदान शिबिराचे उद्घाटन तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन यांनी फित कापून केले. यावेळी सुमारे 35 तज्ञ डॉक्टरांचे पथक सेवा देण्यासाठी सज्ज होते. या शिबिरात कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता रोग निदान व मोफत औषधी पुरवण्यात आली शिबिरात 1300 रुग्णांनी लाभ घेतला तर पारोळा येथे 500 शेतकऱ्यांना फवारणी पंप वाटप करण्यात आले. यावेळी जनतेला दिलासा देण्याच्या हा छोटासा प्रयत्न असल्याचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, जि.प.सदस्य महाजन, माजी जि.प.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, हिम्मत पाटील, पंचायत समिती सभापती दिलीप रोकडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, उद्योजक समाधान पाटील, उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, पारोळा तालुकाप्रमुख प्राध्यापक पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, शहर प्रमुख कुणाल महाजन, अतुल महाजन, सुनील चौधरी, संजय महाजन, रुपेश माळी, नितीन बिर्ला, प्रमोद महाजन, राजेंद्र ठाकूर, देवानंद ठाकूर, गोपाल देशमुख, अमोल भावसार, संदीप बोडरे, गजानन महाजन, नितीन महाजन, गोपाल महाजन, मयूर महाजन, बाळू पाटील, गोविंदा राठोड, राजीव राठोड, प्रदीप राजपूत, गोविंदा बिर्ला, भूषण सोनार, राजेश महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.