⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

ओमायक्रॉनची दहशत : राज्यात उद्यापासून नाईट कर्फ्यु?

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात वाढतच असून देशात देखील संख्या वाढते आहे. केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची टास्क फोर्ससोबत चर्चा सुरू असून उद्या दि.२४ पासून राज्यात नाईट कर्फ्यु लागू होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकार उद्या दि.२४ रोजी याबाबत आदेश काढण्याची शक्यता असून गर्दी टाळण्यासाठी नियमावली घालून दिली जाणार आहे. टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे सण-उत्सव लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल, तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात आली.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून महाराष्ट्रात नाइट कर्फ्यू लागण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर राज्य सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता असून दोन दिवसांपूर्वी देखील केंद्राने याबाबत राज्याला सतर्क केले होते. प्राप्त माहितीनुसार राज्यात आज ओमायक्रॉनचे २३ रुग्ण आहेत. परदेशातून येणारे प्रवासी आणि कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असून आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ओमायक्रॉनच्या दहशतमुळे मध्यप्रदेश सरकारने नाईट कर्फ्यु लागू केला असून आवश्यकता भासल्यास आणखी निर्बंध लादण्यात येतील असे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :