गुरूवार, सप्टेंबर 14, 2023

अरे देवा.. जि.प.शाळेतच चोरट्यांनी केला हात साफ, हजारोंचा ऐवज चोरला

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । चोरटा कुठे डल्ला मारेल हे सांगणे कठीण आहे, चक्क जि.प.शाळेच्या कडी कोयंडा तोडून तब्बल ७१ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे दि. ८ ते १२ रोजी दरम्यान घडलीय. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे जिल्हा परिषद शाळा आहे. दि. ८ ते १२ रोजी दरम्यान, अनोळखी भामट्यांची शाळेच्या एका बंद खोलीचे कडी कोयंडा तोडून तब्बल ७१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी ( उदय नवले वय ३८, रा. मेलाणे ता. चोपडा) यांनी दि. १३ रोजी येथील ग्रामीण पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार पोना. देविदास मधुकर कुनगर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानुसार भादवी कमल ३८०, ४५४,४५७ प्रमाणे अनोळखी भामट्यांविरुद्व गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकॉ. शिवाजी ढबू करीत आहे.