⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जिल्हा नियोजन अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । जळगाव जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांचा बुधवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे दिलासा आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांना व्हायरल फिवरचा त्रास जाणवत होता. अखेर बुधवारी रॅपिड ऑन्टीजन चाचणी केली. या चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या तीन दिवसात जिल्हा नियोजन समिती कार्यालयात संपर्कात आलेल्या अभ्यांगतांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन प्रतापराव पाटील यांनी केले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कोरोना एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही.

सद्य:स्थितीला ९ कोरोना बाधितांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. एकीकडे कोरोनाच्या नवीन विषाणूने इतर जिल्ह्यांमध्ये कहर केला आहे. सुदैवाने जळगावात कोरोना बाधितांची संख्या हातावर मोजण्या इतकीच आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ८१७ कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४० हजार २२९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

हे देखील वाचा :