जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी अपडेट आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) भरती मोठी पदभरती सुरु आहे. विशेष 12वी ते पदवीधरांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२५ निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी npcilcareers.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ३९१ पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.

ही पदे भरली जाणार?
1) सायंटिफिक असिस्टंट-B 45
2) कॅटेगरी I-स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) 82
3) कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/Technician) 226
4) असिस्टंट ग्रेड-1 (HR) 22
5) असिस्टंट ग्रेड-1 (F&A) 04
6) असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) 10
7) नर्स – A 01
8) टेक्निशियन/C (X-Ray Technician) 01
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Electrical/ Instrumentation/ Electronics/Mechanical) / 60% गुणांसह BSc. (Computer Science)/ BSc. (Statistics)
पद क्र.2: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Mechanical/ Instrumentation /Electronics)/ 60% गुणांसह B.Sc.(Physics, Chemistry & Mathematics)
पद क्र.3: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Instrument Mechanic, Electrician, Electronics Mechanic, Fitter, Turner, Machinist, Draughtsman-Civil, Draughtsman-Mechanical)
पद क्र.4: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.5: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.6: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.7: 12वी उत्तीर्ण + नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा किंवा BSc.(Nursing) किंवा नर्सिंग “A” प्रमाणपत्र + 3 वर्षांचा अनुभव
पद क्र.8: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 एप्रिल 2025 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क: [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
पद क्र.1, 2 & 7: General/OBC/EWS: ₹150/-
पद क्र.3,4, 5, 6, 7 & 8: General/OBC/EWS: ₹100/-