गुन्हेअमळनेर

‘त्या’ वाळू प्रकरणी दोन तहसीलदारांसह ६ अधिकाऱ्यांना नोटिसा; जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने महसूल वर्तुळात खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील वाळू घाटावर कायद्याचे सर्रास उल्लंघन झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अमळनेर व चोपडा येथील तहसीलदार, मंडळाधिकारी आणि तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

valu sad

अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदीवरच्या वाळू घाटावर जप्त केलेल्या वाळूसाठ्चापोटी १२ लाख ७९ हजार ३४४ रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर जप्त यंत्रणा सामुग्री पोटी १ कोटी ६१ लाख ७० हजारांना दंड ठोठावला आहे. एकीकडे दंडात्मक कारवाई होत असताना दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदार यंत्रणेला कारवाईच्या रडारवर आणले आहे.

त्यानुसार अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, चोपड्याचे भाऊसाहेब थोरात, सावखेड्याचे मंडळाधिकारी कल्याणी पाटील, तलाठी पवनकुमार शिंगारे, निमगव्हाणचे मंडळाधिकारी सुरेश पाटील व तलाठी तिलेश पवार यांना नोटीस बजावून २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कारवाईचा निर्णय घेणार आहेत

निलंबनाची शक्यता
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार दोषी ठरल्यास तलाठी व मंडळाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. तर तहसीलदारांवर कारवाई निश्चित करून तसा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाईचा निर्णय महसुल विभाग घेणार असल्याचे सांगण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button